मला प्रेम करायचय
मला प्रेम करायचय
मला प्रेम करायचय त्या कधी न बघितलेल्या स्वप्नांवर
स्वप्नात येणाऱ्या त्या क्षणावर ....
मला प्रेम करायचय त्या नेहमी हसणाऱ्या चेहऱ्यावर
निस्वार्थ बोलणाऱ्या त्या शब्दावर ....
मला प्रेम करायचय त्या सुंदर मनावर ज्याने केलाय ताबा माझ्या हृदयावर
खूप जगावेगळ्या असलेल्या त्या विचारांवर....
मला प्रेम करायचय जस पवित्र होत राधेकृष्णच....
असच प्रेम करता करता जीवन जगण्याचा आनंद घ्यायचाय आणि मला प्रेम करायचय....
ते जीवन जगत असताना आईबाबांनी बघितलेल्या स्वप्नांना मला पूर्ण करायचय ....आणि
मला प्रेम करायचय आणि काहीतरी जगावेगळं करायचय..

