STORYMIRROR

Pradip e More

Others

4  

Pradip e More

Others

नाती

नाती

1 min
366

जीवनात नाती तशी अनेकच असतात,

पण ती जपणारी लोक फार कमीच असतात|


काही नाती असतात जन्मो- जन्मीची,

तर काही . . 'काही क्षणापुरती'|


काही नाती असतात, लांबूनच आपले म्हणणारी ,

जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी|


काही नाती असतात, पैशाने विकत घेता येणारी,

तर काही प्रेमाने आपलेसे करणारी|


काही नाती असतात, न जोडतासुद्धा टिकणारी,

तर काही जोडूनसुद्धा तुटणारी|


Rate this content
Log in