स्वप्न माझे...
स्वप्न माझे...
1 min
3.1K
मला माझे स्वप्न जपावे वाटते
पण काय करू जग हे माझेच वाटते
मला रोखावे पाऊल स्वत:चे वाटते
रोखून पुन्हा दुनियेशी भेटावे वाटते
मला माझे स्वप्न जपावे वाटते
इतरांच्यातही मला आपलेपण वाटते
वाटेवरती जगीच्या थोडे थांबावे वाटते
माझ्याचकरिता पुन्हा पुढे चालावे वाटते
मला माझे स्वप्न जपावे वाटते
माझ्यातच वसलेल्या जगताशी भेटावे वाटते