STORYMIRROR

Preeti Muthal

Romance Others

3  

Preeti Muthal

Romance Others

मला आजच कळाले

मला आजच कळाले

1 min
372

तुझ्या येण्याने मनी प्रेमाचे अंकुर उमलले,

मान्य मला भावनिक होऊन मी गुंतले,

मान्य मला सहवास नाही, तरीही तुझ्यात रमले,

तुझ्या प्रेमाने स्वतः स पूर्णत्व मी मानले,

सालभर का असेना, तु माझा हे मी स्वीकारले,

तूझ्या मिठीत फक्त मीच सुरक्षित असे मज वाटले,

पण....

आहेत मजसारख्या अनेक स्वप्नाळू हे समजले,

नाही मी तसूभरही वेगळी हे मज आज उमगले,

प्रेमच नाही माझे निराळे, हे बोलण्यावरून जाणवले,

नव्हती अपेक्षा कधीच मिळवण्याची, हे तु न जाणले,

जगवेगळे प्रेम हे आपुले, म्हणता म्हणता तु साधारण मज मानले,

तुलना माझी सगळ्यांबरोबर करुनी, मन माझे मोडले,

माझ्या सारख्या खुप आहेत, मी न वेगळी हे पाहिले,

मीच या राजाची राणी नाही, हे मला आजच कळाले...

हे मला आजच कळाले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance