मखमली गालिचा
मखमली गालिचा
मखमली फुलांचा गालिचा पसरला भुईवरी,
जसे सज्ज असे स्वागतास तो माझ्यासवेही,
आता फक्त्त तू येण्याचा अवकाश आणि
पुन्हा बरसेल पुष्पवृष्टी अशीच भुईवरी,
वाट तुझी पाहताना आतुरता शिगेला गेली,
लाॅकडाऊन पाहता मन मात्र उदास करी,
रोज नवीन कविता आणि नवीन शब्द तुझ्यासाठी,
गालिचा पसरवण्याचा अनोखा थाटही मांडला उत्कंठेपोटी,
पण तू येऊ शकत नाही ही खात्री मात्र मनाची,
तरीदेखील रोज सजवील असाच पिवळाधम्मक,
शांत आणि मखमली गालिचा फक्त तुझ्या स्वागतासाठी...