लयबद्ध जीवन
लयबद्ध जीवन
राग छेडिता विणेचे,
तरंग वेधिले मनीचे।
रेखाटले चित्र तुझे,
लोचनी माझ्या प्रीतीचे॥
घुमजाव होता स्वरांचे,
निनादले ब्रह्मांड अवघे।
साथ तुझ्या सूरांचे,
तालात माझ्या जगणे॥
धरताना ठेका तुझ्यासवे,
गवसले मज नवे विश्व माझे।
गाताना गाणे मनमोकळे,
जीवन लय बद्ध झाले सारे॥