STORYMIRROR

vaibhav shelke

Tragedy

3  

vaibhav shelke

Tragedy

मजुरांचा लॉकडाऊन

मजुरांचा लॉकडाऊन

1 min
11.9K

दोन पैसे कमवायच्या इच्छेने

सोडलेला जो गाव होता

साऱ्या स्वप्नांवर अचानक

झालेला तो घाव होता

भुकेल्या पोरांच्या डोळ्यात मला

माझा हरलेला संसार दिसत होता,

कारण एवढंच त्या मागचं 

की गरीब त्यांचा बाप होता...


राहीन मी उपाशी

पण त्या पोरांचं काय ?

काम बंद पैसे बंद

घरच्याभाड्याचं करायचं काय ?

आजच्या अर्ध्या भाकरीवर 

उद्याच्या भाकरीचा प्रश्न होता ,

कारण एवढंच त्यामागचं 

की गरीब त्यांचा बाप होता...


लावून बघितला दिवा 

भांडी ही बघितली वाजवून

नाही सरत अंधार पाहून

मन आलं भरून,

श्रीमंतांच्या रोगाने गरीबाचा

केलेला घात होता,

कारण एवढंच त्यामागचं 

की गरीब त्यांचा बाप होता...


माहीत आहे घरी थांबणं

आहे जरुरी देशासाठी,

पण हातावर पोट 

असणाऱ्यांचं काय?

काम करावं लागेल

आजारी बायकोच्या इलाजासाठी,

माझ्या नाकर्तेपणाचा 

झाला मला त्रास होता,

कारण एवढंच त्यामागचं की

गरीब तिचा नवरा होता...


पुढच्या वेळेस आला तर 

श्रीमंतांना बाहेरच ठेव देवा,

ही देखील वेळ निघून जाईल

तोवर उभं राहण्याचं बळ दे देवा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy