STORYMIRROR

Shri kaviraj

Inspirational Others

3  

Shri kaviraj

Inspirational Others

मिरगाचा पाऊस

मिरगाचा पाऊस

1 min
173

मिरगाचा पाऊस ,

डोळ्यांचे पारणे ,

फेडणारी ,

नवती वृक्षवल्लीची ,

झळझळत होती ,

वैशाखाचा उनाड ,

बेभान वारा ,

मस्तीत हुंदडत होता ,

काळ्या-काळ्या ढंगाचे ,

डोंगर उंच अकाशी ,

गरगरत फिरत होते ,

काळ्या मिशांचे भृंग ,

दिसताच आया -भगिनी ,

त्याला हळदी - कुंकू ,

वाहत होत्या ,

मिरग निघाला पावसाचा ,

ऐकमेकांना सांगत होत्या ,

आता जाम पाऊस पडणार ,

हा मिरगाचा पायगुण होता ,

हे सर्वजन एकच ,

ईशारा देत होते ,

पहिल्या-वहिल्या ,

मिरगाच्या पावसाची ,

अगमण सुचना ,

आवखळपणे ,

देत होते ,

रिमझिम धारा ,

आता बरसणार ,

गंध मातीचा ,

आसमंती दरवळणार ,

श्री कविराज सांगतोय ,

तयार व्हा ,

मिरगाच्या पावसात निसर्गासवे ,

आपण ही चिंब -चिंब भिजणार ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational