मिजास
मिजास
अशीच होती एक गाय व्याली
समोरच्या परसात होती प्रसूत झाली|
तिला झाले गे एक मृत वासरू
कळताच गाय लागली हंबरू|।
पान्हा फुटून गे धारा लागल्या|
भूमातेच्या मुखात बरसू लागल्या||
बावरी गाय वासरल चाटू लागली|
काळजीची इंगळी मनास ढसली।।
मदतीला तिच्या कोणी ना आले|
उफ उस करून सारे गेले|
वासरला चाटून घसा कोरडला|
माईचा लेक कुणीही पुढं ना आला|।
असेच का जगा रे तुझे वागणे|
बाष्कळ शब्दांचेच फक्त बोलणे।
हीच तुझी माय बहीण असती ।
गाडीतुन दवाखान्यात नेली असती।।
तिचच बाळ जर राहील नसतं।
जग सार भेटण्या आल असतं।
सांत्वन करण्या आप्तमंडळी सारी।
माणूस जन्मा तुझी मिजास भरी।।
