गळाभेट
गळाभेट
1 min
159
उबगोनी संसारी।तुझ्या श्रीहरी।
नित्य मी पंढरी।येत असे।।१।।
किती सरले दिस।लागलीसे आस।
जीव कासावीस।तुझ्याविना।।२।।
काय झाला गुन्हा।दारी हा कोरोना।
पंढरीच्या राणा। काय करू।।३।।
टाळ नी मृदुंग।नसे रे अभंग।
ना रिंगणाचा संग।याही वर्षी।।४।।
पुरे झाले देवा।विठ्ठला केशवा।
सोडविशी जीवा।नाहीतरी।।५।।
कोरोनाचा कहर।घेई ना माघार।
जग हे बेजार।झाले आता।।६।।
रामकृष्ण हरी।चुकली रे वारी।
सुनी ही पंढरी। बघवेना।।७।।
पाहे डोळा वाट।व्हावी गळाभेट।
नको आता न्हाट।रुक्मिणीवल्ल्भा।।८।।
