Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sapana Meshram

Tragedy

2  

Sapana Meshram

Tragedy

मी निर्भया

मी निर्भया

1 min
451


लूट करती सारे माझी

संपत्ती जणू जगाची ,

भक्षक ही दूनीया झाली

झाले भक्ष मी या जगाची,

जग शिकार करतो जीची अशी एकटी मी निर्भया......

पिता बंधू अजगर सारे

दंशाची ही नाती,

नाही कूणी वाली माझे

कसली ही नाती ....

कूठे श्राद्ध माझा होतो

कूठे होते माझी माती,

इच्छेचे डोंगर खचले

आले दुःख माझ्या हाती ,

अन्याय सहन करणारी अशी एकटी मी निर्भया.....

जग शिकार करतो जीची अशी एकटी मी निर्भया.....

कधी दगडांचा मारा

कधी लाठीमार ,

शमतो ना घाव माझा

करता प्रहार ,

राक्षस दूर्योधन सारे

दृष्टीहीन झाला विधाता ,

भिक दयेची मागते मी

श्वास माझे जाता जाता ,

व्रूत्तात झळकणारी अशी एकटी मी निर्भया.....

जग शिकार करतो जीची अशी एकटी मी निर्भया....

" विष प्राशन करणारी मी

सारे अत्याचारी तूम्ही ,

एक विश्र्वास करणारी मी

सारे विश्र्वासघाती तूम्ही ,

माझे काय ! मी तर निरपराध असह्य बाहूली तूमच्या मूठीतली ,

अरे जिला माय म्हणता तीज करणारे तूम्ही

जीला माय म्हणता तीज वेश्या करणारे तूम्ही "

धिंगाणाच होतो रोज

माझ्या ममतेचा ,

अश्रू झाले बोल माझे

मूकी झाली वाचा ,

जळणारा देह माझा

प्राण माझे झुंजणारे ,

अब्रु वेशीवरती माझी

मेले काळीज धडधडणारे ,

कधी तळमळते तर रोज अशी रडणाी मी निर्भया.....

जग शिकार करतो जीची अशी एकटी मी निर्भया


Rate this content
Log in

More marathi poem from Sapana Meshram

Similar marathi poem from Tragedy