STORYMIRROR

Ameet Palve

Tragedy

4  

Ameet Palve

Tragedy

मी का येवु जन्माला

मी का येवु जन्माला

1 min
373

आईच्या गर्भात असताना

प्रत्येक मुलीला प्रश्न पडत असावा।


मी का येवू जन्माला?

राक्षस तैनात पृथ्वीवरती

मला मारायला।


काळजावरती दगड ठेवून

जन्म जरी घेतला

समाजाचे जावू द्या

आई-वडील स्विकारतील का मला?


आई ही एक स्त्री आहे

ती हे का विसरते

समाजाच्या बंधनाला बळी पडून

स्त्रीभृणहत्या करण्यास प्रवृत्त का होते?


परक्यांचे जावू द्या

आपलेच झाले आपले वैरी

समाजाची विकृती

किती निकृष्ट दर्जाला गेली

मुलाला वंशाचा दिवा

मुलीला परक्याचे धन मानू लागली।

मग, का येवू नये प्रश्न मनाला

मी का येवू जन्माला?


ना दिसत कुठे जिव्हाळा

ना कुठे आपुलकी

जो-तो पेटू लागला आपल्या वंशाचा दिवा।


हिम्मत करून जन्म घेतला

लग्नात हुंड्यासाठी

बापाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर चढला।


कर्ज फेडता-फेडता

मृत्यूला टेकला

हे पाहण्यापेक्षा प्रश्न पडतो मनाला

मी का येवू जन्माला?

मी का येवू जन्माला?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy