म्हातारा
म्हातारा
हळू हळू झालो मी म्हातारा
होऊ लागलो मी बेसहारा
पोर सुखी आपल्या संसारात
मला रोजच शब्दांचा मारा ।।
का सोडून गेली तू माझी मैना ?
माझ्या एकट्या जीवाला चैनच राहीना
तूझ्याकड याव वाटतय मला
खूप सोसली गं ही वाईट दैना ।।
तूझ्याविना पडलोय मी एकटा
जगण्याच्या शोधतोय रोज नव्या वाटा
आधीच केला असता धनाचा साठा
खाव लागल नसत्या पोरांच्या लाथा ।।
मला माझी कळली गं चूक
सोसतोय गप गुमान मूक
देवाकडे मागतोय मरणाची भिक
तू आहेस तर का गं तिकडे ठिक ?
ही दुनिया नाही कुणाची सखी
येत हाय मी लवकरच नक्की
भेट तर होईल ना आपली पक्की !
