मावळत्या सूर्याने
मावळत्या सूर्याने
त्या मावळत्या सुर्याने
केला इशारा आहे
तुझ्या गंधीत श्वासात
मी मिसळण्यास आतुर आहे...
नको आता उगाच नखरा
जीवाला लागली तुझी आस आहे
तुझ्या मिठीत विसावण्या
सख्या मी आतुर आहे...
तुझ्या करारी नजरेत
धुंद धुंद निनावी नशा आहे
तुझ्या डोळ्यात कैद होण्यास
सख्या मी आतुर आहे...
रांगड्या ओठांचा स्पर्श
भलताच खट्याळ आहे
तुझ्या चुंबनाच्या वर्षावात भिजण्यास
सख्या मी आतुर आहे...
तुझ्या शांत लयीतील श्वासात
मदनाचा अंगार भलताच आहे
त्या अंगारावर झुलण्यास
सख्या मी आतुर आहे...
तुझा प्रणयी झुला सख्या
भलताच उनाड आहे
त्या उनाड प्रणयामध्ये मिसळण्यास
सख्या मी आतुर आहे...

