काळजाच्या पार आहे
काळजाच्या पार आहे
1 min
199
गुलाबाच्या पाकळीचा
ओठावर आव आहे
सावरु कशी स्वत:ला
जिव्हारी हा घाव आहे...
नव्हतीच कल्पना मज
काटे हे टोकदार आहे
तुझ्या चुंबनाची आरी
काळजाच्या पार आहे...
शीतल तो चंद्रमा
शिकारी कोळी आहे
दोष का द्यावा त्याला
चांदणीच भोळी आहे...
