STORYMIRROR

सुभाष मंडले

Inspirational

3  

सुभाष मंडले

Inspirational

मावळत्या सूर्या आरे थांब, मावळू नकोस.

मावळत्या सूर्या आरे थांब, मावळू नकोस.

1 min
158

मावळत्या सूर्या आरे थांब, मावळू नकोस.


मावळत्या सूर्या आरे थांब, मावळू नकोस.

तुझ्या प्रकाशाने मिळालेलं,

अस्तित्व असं क्षणात मिटवू नकोस.


आताशी कुठे लोकांच्या ओठांवर हसू उमटायला लागले आहे,

त्यांच्या गालावर असं आसू उमटवू नकोस.

मावळत्या सूर्या आरे थांब, मावळू नकोस.


प्रत्येकाच्या मनामनात आशेच्या उजेडाची पेरणी केली आहेस,

उंच शिखरावर पोहोचण्याचं बळ देऊन,

त्यांना निराशेच्या काळोखात ढकलून देऊ नकोस.

मावळत्या सूर्या आरे थांब, मावळू नकोस.


आताशी मंत्र्यांच्या, मुठभर लोकांच्या बंगल्यापर्यंत तुझा प्रकाश पोहोचला आहे.

गरिबांच्या झोपडीपर्यंत तुझा प्रकाश पोहोचू दे.

त्यांच्यात गरिबीची, रोगराईची बुरशी वाढू देऊ नकोस.

मावळत्या सूर्या आरे थांब, मावळू नकोस.


लबाडांना, गरिबांचं शोषण करणाऱ्यांना, चोरट्यांना चांगलाच धडा शिकवायचा आहे,

तू फक्त मावळू नकोस,

तू मावळून त्यांना अंधाराची साथ, मिळवून देऊ नकोस.

मावळत्या सूर्या आरे थांब, मावळू नकोस.


तुझ्या तेजाने आमच्या बुद्धीला प्रेरणा मिळालेली आहे.

तुझ्या प्रेरणेचं बळ आमच्या कर्तृत्वात उतरल्याशिवाय, तू जाऊ नकोस.

मावळत्या सूर्या आरे थांब, मावळू नकोस.


Rate this content
Log in

More marathi poem from सुभाष मंडले

Similar marathi poem from Inspirational