STORYMIRROR

कवी-चेतन जाधव

Inspirational

3  

कवी-चेतन जाधव

Inspirational

माझ्यासाठी काय केलं

माझ्यासाठी काय केलं

1 min
179

उपकार मानायचं सोड पण

तू आयुष्यात त्यांना काय दिलं,  

तोंड वर करून काय विचारतोस 

आई बापानं माझ्यासाठी काय केलं. 


त्यांनी नव्हती झिडकारली 

संगोपनाची जबाबदारी तुझी, 

नेहमीच पाठीवर वाहत राहली 

लेकरांसाठी कर्तव्याची ओझी

अश्या कर्तव्यदक्ष पालकांसाठी 

तुझं कर्तव्य कुठं गेलं, 

तोंड वर करून काय विचारतोस 

आई बापानं माझ्यासाठी काय केलं. 


करू नकोस तू तुझ्याचं हातानी 

तुझीच मोठी हानी, 

वृद्धाश्रमात सोडलंय आई बापाला 

तुझ्यासारख्या काही नालायकांनी

सुखी भाकरी खाल्ली त्यांनी 

तुला पोटभर रे दही दुधाचं पातेलं 

तोंड वर करून काय विचारतोस 

आई बापानं माझ्यासाठी काय केलं. 


धनाची अपेक्षा नाही रे त्यांना 

प्रार्थना करतात ते तुझ्याचसाठी, 

सुकत चाललेल्या त्या वृक्षासाठी 

हो ना तू आधाराची काठी, 

लक्षात ठेव तू ही म्हातारा होशील 

नको येऊ दे तुझ्यावर अशी वेळं 

तोंड वर करून काय विचारतोस 

आई बापानं माझ्यासाठी काय केलं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from कवी-चेतन जाधव

Similar marathi poem from Inspirational