माझे गुरू
माझे गुरू
ज्यांनी मज शिकविले
ते ते माझे गुरु झाले.
आई-वडील प्रथम गुरु
त्यांच्यापासून जीवन सुरु.
शाळेमध्ये शिक्षक शिकवती
संस्काराचे उत्तम धडे देती.
समाजात हसलो खेळलो
अनुभवातून तिथंच घडलो.
मित्र नातलगांनी आधार दिला
त्यांनाही माझा गुरु केला.
निसर्ग आपणास जगवतो
आपले जीवन तो फुलवतो.
प्राणी-पक्षी निसर्ग बघतो
निस्वार्थीपणा मी शिकतो.
तऱ्हेतऱ्हेची माणसे मिळाली
त्यांच्यामुळे दुनिया कळाली.
जो जो मज भेटत गेला
काहीतरी शिकवत राहिला.
लहान-थोर सगळे माझे गुरु
चांगले विचार सदा स्मरू
