lockdown
lockdown
कुणी म्हणे काय तर कोणी सांगेल काय
लॉकडाउनचा प्रत्येकाला वेगळाच अनुभव आलाय
कुणी म्हणे आम्ही संसारात रमलो,
पुन्हा एकदा एकमेकांना ओळखलो!
कोणी म्हणे आम्ही आत्म सारखे केला,
सहजीवन आणि स्वतःला पुन्हा एकदा भेटलो
कोणी म्हणे खूप चांगले क्षण जगलो,
बायकोला किचनमध्ये मदत करुन खूप भारावून गेलो.
पण माझ्या नशिबी विरहाच आले,
नवरा घरी असूनसुद्धा एकही दिवस ना मन मोकळे झाले!
वर्क फ्रॉम होमच्या नावाने त्याने दिवस-रात्र लॅपटॉप समोर घालवले,
उरलेला वेळ मित्रांबरोबर गप्पा मारायला आणि सुजाण नागरिक म्हणून बातम्याबद्दल चर्चा करण्यात घालवला
मी मात्र एकटीच राहिले, तो उद्या तरी माझ्याशी बोलेल थोडावेळ
माझ्यासोबत पण वेळ घालवेल म्हणून उद्याच्या रात्रीची वाट पाहत आजची रात्र घालवली
लाॅकडॉऊनमध्ये कोणा काय तर कोणा काय अनुभव आले