लेखणी
लेखणी
असे लेखणी
जशी तलवार
शब्द धारदार
दिसे देखणी...१
असे कमाल
जीवन बदले
समाज घडले
करी धमाल...२
किमया असे
प्रगल्भ विचार
सालस आचार
बदल तसे..३
घाव करीती
शब्दांची किमया
शिकवी लिलया
घाम फोडीती...४
दुरुपयोग
काहुर मनात
आनंद जगात
सदुपयोग....५
वाचा फुटेल
अन्याय सरेल
प्रचार घडेल
दास्य सुटेल ...६
