STORYMIRROR

S. Wavdhane

Children

3  

S. Wavdhane

Children

लेक माझी

लेक माझी

1 min
94

तू घराचे नवचैतन्य

तू माझ्या स्वप्नातील परी

तुझ्याच भोवती फिरते

माझी दुनिया सारी


तुझे गोड बोबडे बोल

मोहवतात मनाला

तुझ्या पैंजणांची छुम छुम

सुखावते साऱ्या घराला


देह तुझा चिमुकला

परि विचार करते भारी

अनमोल तू सर्वांसाठी

प्रेमाचा वर्षाव करणारी


आजीसम काळजी घेणारी

आहेस तू जराशी वेगळी

घराला घरपण देणारी

तू लेक माझी सावळी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children