व्यथा भारतमातेची
व्यथा भारतमातेची

1 min

67
स्वातंत्र्य मिळूनही भारतमाता
शोक करूनी रडत होती
सुजलाम सुफलाम देश माझा
कुठे हरवला शोधत होती
दुःखी आहे भारतमाता
पाहूनी भारत आजचा
स्वार्थासाठी पाय खेचतोय
माणूस इथे दुसऱ्याचा
कष्ट करूनी बळीराजा
पिकवतो धान्याचे मोती
परि भ्रष्टाचाराच्या दलदलीत
कष्ट त्याचे मातीमोल ठरती
नाही थांबले अजूनही
महिलांवरचे अत्याचार
अपेक्षांचे ओझे वाहत
फिरतोय सुशिक्षित बेकार
घेऊनी प्रेरणा महापुरूषांची
आठव क्रांतीवीरांचे बलिदान
घडव आदर्श भारत माणसा
विकू नको तू स्वाभिमान...