लावणी
लावणी
राया आता जपून जपून चाला हो रस्त्यावरती
ठेच लागेल पाय मोडेल वेळ येईल भलतीllधृll
दिली तुम्ही पैठणी भरजरी
भलतीच खुशीत दिसते स्वारी
रंगात आला तुम्ही आज भारी
करुन घेऊ चला न्याहरी
मजशी चल म्हणता तुम्ही हो गडावरती
ठेच लागेल पाय मोडेल वेळ येईल भलती
राया आता जपून जपून चाला हो रस्त्यावरती
ठेच लागेल पाय मोडेल वेळ येईल भलतीll१ll
असे नागमोडी ही वाट
भलतीच अवघड पायवाट
झाडे वेली हो घनदाट
माणसास माणूस खेट
दिस आलाय हो भलताच वरती
ठेच लागेल पाय मोडेल वेळ येईल भलती
राया आता जपून जपून चाला हो रस्त्यावरती
ठेच लागेल पाय मोडेल वेळ येईल भलतीll२ll
हातात माझा हात धरी
पाय माझे ही थरथरी
खाली पाहता खोल दरी
जीव माझा हो घाबरी...
अरुंद ही वाट पाय घसरल जरा सावरा तरी
ठेच लागेल पाय मोडेल वेळ येईल भलती
राया आता जपून जपून चाला हो रस्त्यावरती
ठेच लागेल पाय मोडेल वेळ येईल भलतीll३ll

