STORYMIRROR

Mithila Lad

Inspirational

3  

Mithila Lad

Inspirational

लाॅकडाऊन

लाॅकडाऊन

1 min
188

बारा वर्षानी ठेवला लेका घरी पाय

दुध नव्हतं अन् दुधावरची साय

प्रश्न पहाता नजरे वरी

थबकले बाप नि माय


   दिलं,एका खोलीत बसवुन

   घेतला दरवाजा लाऊन

   आता तुम्ही 'क्वारंटाईन'

   मोठ्याने ओरडली सुन


झाले आतामहीने चार

तरी ही ऊघडेना दार

विषाणु हा मनातला

केलं कोरोनाचा अवजार


  आली कोरोनाची महामारी

  नियम पाळीता होईल ती दुर

  जरा विचाराने पहा 'सॅनेटाईज'         

  होऊन

  नात्याना करू नका हो            

  'लॉकडाऊन'


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Mithila Lad

Similar marathi poem from Inspirational