कवितेची रात्र..
कवितेची रात्र..
कवितेची रात्र
लिहितोय मी
तुला एक प्रेम पत्र..
पत्रात भरतोय मी
एक एक शब्द
शब्दाला शब्द जुळवून
सखीला माझ्या मी लिहितोय
एक प्रेम पत्र..
कवितेची रात्र
मनात माझ्या चालू असत
तुझ्या आठवणीचं सत्र
तुझ्या माझ्या प्रेमाचं मात्र
लिहितोय मी एक प्रेम पत्र..
आठवणीत तुझ्या ही
सरतीय सारी रात्र
ही आहे माझी कवितेची रात्र
म्हणून लिहीतोय मी
तुला एक प्रेम पत्र...

