कविता
कविता
बालपणाची आठवण
येईल...
पुन्हा पुन्हा मन
दाटून येईल.....!
हुंदके त्यात आले
ते गोड क्षण
निघून गेले
आनंदी क्षण....!
ती खेळणी ती
मस्ती आहे
मनसोक्त दोस्ती
आठवणीत आहे....!
गोळ्या बिस्कीट
गप्पा टप्पा
बसे आमचा
कट्टा....!
लहानपण
देवा...
गोड आठवणी
आम्हा...!
मनसोक्त हिंडुनी
मन उधाण
होऊनी आठवणी
जग बालपणी....!
