मला ही वाटत
मला ही वाटत
मला ही वाटते मी आविष्य जगावं
पण कोणाच्या नाही तर
स्वतः च्या जीवावर जगावं?
मला ही वाटतंय की मी
काही तरी बनाव
मोठं नाही पण छोट
तरी बनाव... !
मला ही वाटते की मी
स्वतः च्या पायावर उभ राहावं
मोठं नाही पण छोट तरी
अस्तित्व माझं स्वतः च
निर्माण करावं...........!
मला ही वाटते की मी
काही तरी लिहावं
साहित्यिक नाही पण
कवयित्री तरी बनाव.....!
मला ही वाटत की मी
इतिहासात नाव करावं
मोठं नाही पण कोण्या तरी
कन्ह्या कोपऱ्यात माझं नाव
इतिहासात दिसावं.........!
मला ही वाटत की मी
गरिबीतून दूर होऊन
स्वाभिमानी जगावं.........!
मला ही वाटत की मी
भुकेलेल्याला अन्न द्याव
वाटसरू ला वाट दाखवावी
तहानलेल्या ला पाणी पाजाव.....!
मला ही वाटत की मी
माझ्या साठी कमी व
समाजासाठी माझं आविष्य
वाहून टाकावं.......!
यासाठी मलाही वाटतं की माझा
निकाल चांगला लागून
माझं सर्व स्वप्न पूर्ण वावं..... !
