STORYMIRROR

Sangeeta Kurhade

Romance Others

3  

Sangeeta Kurhade

Romance Others

कविता..माझे प्रेम

कविता..माझे प्रेम

1 min
344

प्रिये, माझ्या हदयाला अलवार

लागलाय तुझाच गं नाद

स्वंदनात निनादला प्रेमराग

देशील का गं मधूर साद


सत्यातच आहे वेडे ना खोटे

माझे प्रेम साधेभोळे न सोवळे

ठेव विश्वास त्यावर जन्मभर

मन झूरते कधीचे बघ कोवळे


कोसळती तू लाजरी रिमझिम

मी रानचा सोसाट्याचा वारा

होईल का गं आपला मिलाप

बेकार उडे ऊरात प्रेम धारा


आवतीभोवती बघ उडतोय

मनपर्णाचा नाजूक गोड सडा

त्यावर ठेव सखे हळूच पाऊल

प्रित बहराचा उभारलाय कडा


गुनगुनावी मनापासून आपली

सप्तसुरांची सरगम प्रेम माळ

निळसर नभाचा हळवा चांद

सजविन चांदण्यानी प्रेम भाळ


स्वप्नानातील माझ्या रूपवती

आकाशी कांती तू तर मोहिनी

गुंतलो जन्मभरासाठी तेजाने

नक्षत्र वेढलेली वेल तू रोहिणी


मी नाही शब्दाचा कुणी शायर

अतोनात तुझात बुडलोय खरे

दुनियादारी मानतो ना कायर

एवढे की तुजसवे जीवन सरे


सजवली मी युगे प्रित आरास

तेथेही सांडल्या मी आठवणी

पुन्हा पुन्हा वेचायला मी उभा

माझी करू नकोस पाठवणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance