कविता "दुष्काळ "
कविता "दुष्काळ "
मन माझ गेल पिळून
आता पाऊस काय पडना
मेला दुष्काळ काही सरना..
हा कोरडा दुष्काळ आला
शेतकरी लागला मरायला
सरकार काही बोलना
मेला दुष्काळ काही सरना..
सरकार लागल जवा बोलू
पैका वाटप झाला चालू
अनुदान काही पुरना
मेला दुष्काळ काही सरना..
पाऊस आला भरून
सोयाबीन गेले वाहून
ऊस मला काही देखवना
मेला दुष्काळ काही सरना..
हा ओला दुष्काळ आला
साऱ्या शेतीचा बोऱ्या झाला
आता मला काही सुचना
मेला दुष्काळ काही सरना..
शेतकरी लागला रडू
शेतीतला माल लागला सडू
आता शेतकरी काही जगणा
मेला दुष्काळ काही सरना..
