कविता - चिंब
कविता - चिंब
चिंब भिजलेली रात्र
त्यात चंद्राचा शीतल प्रकाश
अल्लड छळणारा वारा
भवती तू असल्याचा भास....
चिंब नहालेलं आकाश
वर चांदण्या खाली रातराणीचा चमचमाट
पसरला दुरवर सुगंध
लाजल लाजाळूचं कैवार...
बदलला वाऱ्याचा अंदाज
वाहू लागला चोहीकडे सावकाश
चांदण्या कश्या लपल्या
चिंब ढगाळलेल्या आकाशात...
सुरु होता चंद्राचा लपंडाव
अजूनच मोहक झाली रात्र
दरवळू लागला सर्वत्र
प्रेमाचा अनोळखा सुवास...
चिंब सजलेली रात्र
माजला शांततेचा काहूर
असंख्य चांदण्या पांघरून
निघाली तुझिया शोधात...
