STORYMIRROR

Ashvini Duragkar

Others

3  

Ashvini Duragkar

Others

तुझी आठवण.....

तुझी आठवण.....

1 min
333

तुझी खूप आठवण येतेय....

  तुला कुठे शोधु?

माझ मलाच कळत नाही...


रात्रीच्या प्रकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्यात...की,

हृदयाच्या कोपऱ्यात धडधडणाऱ्या ठोक्यात।।१।।


 सतत होणाऱ्या अश्रुंच्या वर्षावात....  की,

विसकटलेल्या अंथरूणात पडलेल्या सिलवट्यात।।२।।


घरच्या-बाहेरच्या कान्या कोपऱ्यात...

की,

तुझ्या घालुन अडकवलेल्या कपड्यात।।३।।


सांग ना तुला कुठे शोधु?

माहिती आहे...


श्वास ज़री माझा असला...

तरी गंध त्यात तुझाच झळकतो,

डोळे ज़री माझे असले....

तरी अश्रु बनुन तुच छलकतो.।।४।।


झुळझुळणारा वारा....

   स्पर्श तुझा करून जातो,

बाहेरचा गारवा... 

   तुझी ऊब देऊन जातो।।५।।


तुझ्याविणा जगण खूप...

  कठीण होत,

मनाला खूप समजवुन ही...

  कस रे मन वेड होत।।७।।


नकळत तुझा भास....

   मला नेहमीच होतो,

तू नाही हे कळताच...

   विरहाचा तो क्षण आठवतो।।६।।


जातांनाचा चेहरा तुझा...

  डोळयांसमोर येतो,

डोळयातील अश्रुंना....

  तू कसा माझ्यापासन लपवतो।।७।।


लपवलेल्या अश्रुंतून ....

  एक अश्रु बाहेर पडतो,

तू किती प्रेम करतो माझ्यावर...

  ते हळूच सांगुन जातो।।८।।


Rate this content
Log in