कष्टाची भाजी भाकरी
कष्टाची भाजी भाकरी


नको कोटींचा बंगला
सुखाची बरी झोपडी
समाधान नांदो तिथे
सुखाची प्रचिती रोकडी
नको महागड्या गाड्या
पायांचे वाहन बरे
लाभेल दीर्घ आयुष्य
आरोग्य लाभेल खरे
नको तो पैसा अमाप
नको ते दागदागिने
खरी श्रीमंती तिथेच
जिथे येतात घरी पाहुणे
नको तो दंभ, अहंकार
नको कुणाची निंदा
माता, पिता, अतिथी
गुरुजनांस वंदा
नको कशात लबाडी
प्रामाणिक करावी चाकरी
लागेल बघा गोड मग
कष्टाची भाजी भाकरी
नको तो खोटा डामडौल
नको तो खोटा हुरूप
समाधान चित्ती असू द्या
सुखाची लागेल झोप