कोरोना आला ,कोरोना आला
कोरोना आला ,कोरोना आला
रोगाचा पाहुणा कोरोना आला,
सर्वत्र त्याने धुमाकूळ पसरवला,
देश माझा त्याने बंद केला,
कोरोना आला,कोरोना आला.
हात स्वच्छ, पाय स्वच्छ, बाहेर जाणे बंद,
चेहऱ्यावर मास्क लावून नाक, तोंड बंद,
घरात बसून बसून जीव कंटाळवाणा झाला,
कोरोना आला , कोरोना आला.
शासनाने सांगितलेले सर्व नियम पाळा,
आवश्यक कामविना बाहेर जाणे टाळा,
मामा नाही, मावशी नाही जीव एकटा झाला,
कोरोना आला, कोरोना आला.
कोरोनाला घाबरू नका, त्याच्याशी लढा,
कोरोनाला शिकवावा लागेल चांगलाच धडा,
कोरोनाशी सतर्कतेने आपण लढू चला,
कोरोना आला, कोरोना आला.
कोरोनाची सर्वत्र पसरली आहे भीती,
कोरोनाची बिघडवली देशाची आर्थिक स्थिती,
कोरोनामुळे शाळाही बंद झाल्या,
कोरोना आला, कोरोना आला.
कोरोनाच्या लसीची उमलली आहे कळी,
कोरोनाला घाबरून त्याला जाऊ नका बळी,
कोरोनाच्या विषाणूवर लसीचा मारा होणार,
कोरोना जाणार, कोरोना जाणार.
