किनारा
किनारा
वाळूत बसता, त्या लाटा
पायाला स्पर्श करत होत्या...
हरवलेल्या माझ्या मनाला
नव्या चेतना देत होत्या...
विरहात मी पार बुडून गेले...
क्षण क्षण आतून तुटत होते...
स्वतःच अस्तित्व टिकवण्या
आतुर लाटेकडून शिकत होते
आळीपाळीने एकेक लाट
किनाऱ्याला भिजवत होती
क्षणाची का होईना साथ त्या
किनाऱ्याची तिला हवेशी होती
कधी मंद स्पर्श तर कधी
उथळ मारा सोसत होता...
तरीही प्रत्येक वेळी लाटेचा
स्पर्श नव्याने जगत होता...
अबोल प्रीत त्या लाटेची
किनारा मुक्याने जाणत होता...
त्यांची ही अनोखी कहाणी
साऱ्या जगाला सांगत होता...

