Online Offline
Online Offline
Touch च्या जमान्यात
जिव्हाळ्याची नाती आऊट ऑफ नेटवर्क झाली
इन्स्टा अन् व्हाट्स ऍप चे स्टेटस जपताना
माझ्यातली मी दुरावली....
एका क्लिक वर सर्व काही मिळतं
म्हणून पुस्तकांची मैत्री बोअरिंग वाटू लागली ..
ऑनलाईन friendship वाढवताना
ऑफलाईन मैत्रीत दारी खोलावली...
like, share & followers मुळे
कॉलर ताट होऊ लागली...
मी, माझं माझं करता करता
माणसातली माणुसकी लागली...
मैदानातले राडे अन् ते खेळ सारे
आता कमी होत गेले..
तेच खेळ आता सारे मोबाईलच्या
स्क्रीन वर नव्याने सजू लागले....
गावाच्या कट्ट्यावरील मंडळी आता
व्हाट्स अँप ग्रुप चे मेंबर झाले
कट्ट्यावरील थापा एखाद भांडण
ग्रुप च्या कंमेंट्स मध्ये बदलले...
या ऑनलाईन touch च्या संवादात
तो मनसोक्त आनंद हरवून गेला
येईल का परतोनी तो श्रावणकाळ
ज्यामध्ये ऑफलाईन माणूस होता सुखावला...
