कारावास
कारावास
तुझ्या प्रेमाचा सहवास
खरचं एक कारावास आहे...
मुक्त असून ही कैद अवस्था
मन माझे अनुभवत आहे...
भेट आपली पहिली
अजूनही स्मरणात आहे...
काळ लोटला तरी तुझ्या
आठवणींत झुरत आहे...
कधी कधी नको वाटतो
पाश हा तोडायचा आहे
तरीही या मनाला तुझ्याच
चौकटीत गुंतायचं आहे
कितीही नाकारलं तरी तुझ्या
नजरेत कैद व्हायचं आहे...
तुझ्याविना अपूर्ण राहते मी
हाच तो कारावास आहे...

