STORYMIRROR

Amol Shinde

Romance

4  

Amol Shinde

Romance

किनारा आठवणींचा

किनारा आठवणींचा

1 min
599


तुला आठवतंय का

नाही ना आठवतं 

तू आणि मी इथेच तर

सारीपाटाचा खेळ खेळायचो

तू राणी मी राजा असायचो


नितांत गरज भासायची तुला

तू जेव्हा एकटीच बसायचीस

माझ्या येण्याने गाली खुदकन हसायचीस

चिंब न्हाऊन जायचो एकमेकांत

नदीचा किनारा अन तो बुडता सूर्य

साक्ष द्यायचा आपल्या प्रेमाची

आज कसं बघ ना सुन सून वाटतंय

बघ ना काळीज आजही ते जपतंय

तू दिलेल्या आठवणी तुझा तो स्पर्श


वाट पाहतोय तो किनारा

तुझ्या माझ्या अगणित मिठीतल्या गप्पा

मिठीतून ओठांपर्यंत ओलांडलेला टप्पा

श्वासांची झालेली घालमेल 

अन आपला चुकलेला ताळमेळ

बघना काळीज आजही ते जपतंय

तू दिलेल्या आठवणी तुझा तो स्पर्श


मला वाटतंय विधिलिखित होत

आपलं भेटणं आपलं खेटनं 

इथेच सारं काही एकमेकांच चुकनं

एकमेकांत कधी विलीन झालो

कधी अंतरंगातून काळजापर्यंत आलो

तुझी उडणारी बट हतावरची मेहंदी

त्या कोरलेल्या नक्षीवर माझी नांदी

वाट पाहते आज सोबत बसलेली फांदी

बघना काळीज आजही ते जपतंय

तू दिलेल्या आठवणी तुझा तो स्पर्श


आज कधी कधी हलकं वाटतं

आभाळ काळजात दाटतं

अश्रूंची शाळा भरते 

पुन्हा तो किनारा आठवतो 

वारा तर सांगूच नको बोलंवण पाठवतो

जाऊन बसावं लागतं मग त्या बाकावर

जिथं तू अन मी भीतं नव्हतो धाकावर

आता विश्वास नाही राहिला कोणावर

कारण माझ्या सोबतीला उरलाय

डुंबणार सूर्य अन तो किनारा फक्त


बघ ना काळीज आजही ते जपतंय

तू दिलेल्या आठवणी तुझा तो स्पर्श



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance