किमया शब्दांची....
किमया शब्दांची....


शब्दांचे अनोखे खेळ
रंगत आणतात अर्थात
शब्द देतात उभारी
शब्दच खच्चीकरण करतात.....
शब्दांना गुंफता हळुवार
भावना हळव्या होतात
शब्द निष्ठुर होता
काळजावर घाव देतात.....
शब्दांची सुमने करून
प्रभूचरणी अर्पावीत
शब्द निघणारे वाणीतून
भक्तीत लीन व्हावीत......
ज्याने शब्द कमावला
तो म्हणावा धनवान
मुखी अपशब्द नसतो ज्याच्या
तोच खरा प्रतिभावान.....
शब्दांची न्यारी किमया
प्रेमात चढवी विश्वास
शब्द कधी बोचतात
घायाळ करती हृदयास.....
शब्द देतात उडण्याचे बळ
भरण्या पंखात शक्ती
शब्द ओळख घडवतात
कळते शब्दातून व्यक्ती......