कधी गुलमोहोर व्हायचे आहे
कधी गुलमोहोर व्हायचे आहे
एक असा हा आहे सुंदर
माझ्या अंगणातील गुलमोहोर
वर्षभर जरी अपर्ण मरगळ
येते कुठून ग्रीष्मातील सळसळ
हिणवती तुझ सगे सोबती
काय करिशी तू एकांती
कधी भासतो अनन्य साधक
कधी विसाव्याचा मित्र क्षणैक
शिशिर सरता चोरपावली
मिरविशी अंगी ही लाली
हे चैतन्य,हे जागेपण तुम्हास जर अनुभवायचे आहे
तर सांगा तुम्ही, तुम्हाला कधी गुलमोहोर व्हायचे आहे
