STORYMIRROR

Subhash Kasar

Tragedy

3  

Subhash Kasar

Tragedy

कासार दादा

कासार दादा

1 min
11.5K

काय सांगू भाऊ, उगीच नाही म्हणती, 

आराम हराम है, त्यातच झाली गणती.. 


सहा महिनेच धंद्यात करावी कमाई, 

सहा महिने सार कुटुंब बसून खाई.. 


चाळीस दिवस घरात बसून खायचे,? 

पुढील चार महिने उपाशीच रहायचे..? 


कमाईच्या वेळेला लॉकडाऊन आला, 

कशाचा आराम? झोपच मोडून गेला.. 


हातावरचे पोट आमचं, फेरीचा धंदा, 

त्यावर आली कोरोना महामारीची गदा.. 


ईमानदारी राखून, गावोगावी फिरावे, 

मिळेल त्या कमाईत समाधानी रहावे.. 


ताई,माई,आक्कांना बांगडी भरी दादा, 

नाही रोख पैसे, तर उधारी चा वादा.. 


नित्य भजन कीर्तन राऊळात करतो, 

प्रपंच करून नेटका रोज पोट भरतो.. 


महामारी च्या रोगाने सारेच परेशान, 

भांडीवाले, बांगडीवाले आणि किसान.. 


सांगा भाऊ, गरीबाने कशी करावी मात,? 

ना गरीब ना श्रीमंत अशी कासार जात.. 


Rate this content
Log in

More marathi poem from Subhash Kasar

Similar marathi poem from Tragedy