कालयवन
कालयवन
थोडे पुढे थोडे मागे पळवुन आलो
कालयवनासही चळवुन आलो
आजन्म करीत राहील याद
असे शेत तयाचे कुळवुन आलो
लागला सामना दोहोत आमचा
तिसर्यास फुपुर्यात मळवुन आलो
अस्त्राचा मारा अफाट केला
बस काही शस्त्रे टळवुन आलो
कृष्ण कृत्य माझेच सारे
मुचकुंदास हे कळवुन आलो
जखमी फक्त तनाने होतो
पण मी ही तयास भळवुन आलो
घेण्या भीम पाशात कोशीस केली
मीच जागेवर खिळवून आलो
नाते ह्दयाचे ह्रदयाशी जुळवुन आलो
रणांगण जरुर सोडले मी पण
येताना हातात हात मिळवुन आलो
