कालचक्र
कालचक्र
चक्र असे हे कालचक्राचे, कधी फिरे उलटे, ना कळे कुणा
मानवाची त्यावर ना चाले कसलीही मात्रा
सकल जना काट्यावर धरुनी आपुल्या,
याची दैनंदिनी भरते काळजाच्या ज्वालांची जत्रा
कालचक्र ...
उभ्या ठाकल्या दाही दिशा, चराचरी-गगनात गाजे
उघड्या परी निर्वस्त्र भासे, वायूसमान हुबे-हुबे
जरी पांघरूनी मखमली चादर, नांदे सौख्य गाजा-वाजे
कोणास नसे भय तयाचे, तरी दारावर नवे संकट उभे
कालचक्र ...
सावट भीतीचे मनात उलथवून, मन हेलावून टाके
मनाच्याच गाभाऱ्यात फुललेल्या कमळाचे चिखल होई
परिपूर्ण होऊनही भास होत असे, त्याच्या कुजबुजण्याचा
रात्र अंधारी-दिवस अनावरी जाई, मुसीबत रोजचीच डोई
कालचक्र ....
ब्रह्मांड कवेत घेऊन भिरभिरे, विध्वंस करी कल्पकतेचा
भावना नसती, नसे करुणा, क्षमा, म्हणवूनी स्व: "कालचक्रयान"
होईल कसे याच्याशिवाय, रचला स्व-परियान पारखतेचा
करी कष्ट, झिजली वहाण, तरी निघालो कराया "विश्व कल्याण"
कालचक्र ...
