STORYMIRROR

Archana jitendra Pardeshi

Romance

4  

Archana jitendra Pardeshi

Romance

काजव्यांची पालखी

काजव्यांची पालखी

1 min
354

तसा तु

नसतोच कधी माझ्याजवळ 

माझी लाडकी अदा पहायला

आज बरा सापडलास 

मी ही नटली तुझ्यासाठी 

मोकळा केशसंभार 

तू सावरशिल माझ्या कुंतलाना

मात्र आज चांद का रुसला असेल

कुठे जाऊन बसला असेल  

सर्वत्र काळाकुट्ट अंधार

आपल्या प्रेमाची साक्ष देणारा कुणीच नाही  

मोगरा ही आज दरवळत नव्हता

वाऱ्यानेही जणू सुट्टी घेतली

शुद्ध त्यांना तू माझा हात हातात घेतला

अन् चांदन्यानेही बट्टी घेतली 

तिच्या मांडीवर डोके ठेवून

घेत होती शोधाशोध सर्वांचा 

नाही कुणीच 

निरागस डोळे तारांगण शोधतांना 

माझा हात तू हातात घेतला 

अन्  

ओंजळीत सुख घेऊन आली

काजव्यांची पालखी  

चांदण्याचं कोंदण  

चंद्राचं झगमगण 

सर्वांची झिज भरुन काढतं 

केलीस रात्र दैदिप्यमान 

अन् 

धुंद प्रणयात न्हाऊन निघालो 

 तु आणि मी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance