माझी माय
माझी माय
मी लहान असताना माझी माय
माझ्या गोष्टीत जगायची
मी जरा मोठी झाल्यावर
हुंदके दाबीत बसायची
गळक्या छपराला माझी माय
ठिगळं लावीत बसायची
पलंगावर आम्ही अन्
आमच्या पायाला माती सुद्धा नसायची
एकदा तिचं झोपड
वाऱ्या पावसानं हादरलं
पलंगाखाली माझ्या मायनं
चारही भावंडांना लपवलं
घाबरलेली होती ती
मन आसवान गहिवरकेल होत
अश्रूंना बांध टाकून
त्या वेळी पुन्हा तिनं सावरलं होतं
मोडलेला घर तिनं तिचं
परत हिमतीनं उभारलं
तिच्या हिमतीचं तोरण
आमच्या डोळ्यापुढे बांधलं
आयुष्यभर तिनं
स्वतःला झिजवले
चारही भावंडांना
पायावर उभं केलं
आयुष्यही संघर्षांना भरलेलं असतं
हे तिच्या जगण्यातून शिकवलं
एकेक संकट पार करत
जिंकायला शिकवलं
पंखात जोर असून चालत नाही
जगण्यात उमेद पाहिजे
दिलेल आयुष्य जगण्यापेक्षा
जगण्यातून आयुष्य उभं केलं पाहिजे
