ज्ञानाची मज दिली वाणी
ज्ञानाची मज दिली वाणी
मनात गुरूंचा आदर
नमन त्यांनाच सादर ।
मी घडलो जडलो जसा
गुरू शिष्य परंपरेचा वसा ।
निर्बुद्धाला तुम्ही केले ज्ञानी
ज्ञानाची मज दिली वाणी ।
केला उभा मज पायावरती
ऋण तुमचे हे कधी न सरती ।
गुरूविना तर शिक्षा अधुरी
तुम्हीच केली ती इच्छा पुरी ।
किरण आशेचा आम्ही बघतो
तुमच्या पुढेच माथा झुकतो ।