STORYMIRROR

Archana Rahurkar

Romance

3  

Archana Rahurkar

Romance

जीवनाचं चौकिदार

जीवनाचं चौकिदार

1 min
211

छबीदार सुरत देखणी नार गुलजार

सोसते यौवणाचा sssमी ..भार...

रेची कट्यार घुसली आरपार..

केला तुम्ही वार झालं तुकडं काळजाचं

                      तुकड काळजाचं

राया तुम्ही व्हा....चौकिदार या जवानीचं llधृll


पायी राया बांधिलं मी घुंगर प्रीत तुम्हावरं

या बसा मंचुकी हाती गजरा लावी तुम्हा अत्तर

राखा मर्जी सजणा मज दान द्या कुंकवाचं

                                   लेन द्या कुंकवाचं

राया तुम्ही व्हा ....चौकीदार या जवानीचंll१ll


तुमचं पाहुनी रूपं साजरं अंग अंगावर येई बहर

तुम्हा साठीचं केला राया मी साज sssशृंगार...

जवळीक करा तुम्ही समाधान माझीया मनांचं

                                         माझिया...मनाचं

राया तुम्ही व्हा .....चौकीदार या जवानीचं ll२ll


रात मिलनाची चांद चकोर.तुम्हासाठी जीव झुर

तना मनात उठलं काहूर जीव माझा होई खालीवर

लागे तुमची अगळीक ओढ सांगा सुटलं कसं हे कोढं

मज लागलं पिस करी उठ बस ओठी नाव येई तुमचं

                                             ओठी नाव तुमचं

राया तुम्ही व्हा......चौकीदार या जवानीचं ll३ll


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance