झाड
झाड
झाड आहे हिरवेगार
वारा देते थंडगार //१//
झाडाच्या सावलीत मी बसते
झाड खुदकन गालात हसते //२//
झाड देते माया
झाड देते छाया //३//
झाडावर भरते पक्ष्यांची शाळा
झाडाखाली सर्व प्राणी होती गोळा //४//
झाडाला लागतात सुंदर फुले
फुले तोडायला येतात मुले //५//
झाड आहे माझा मित्र
मनी माझ्या झाडाचे चित्र //६//
झाडे लावा छान
राखा त्याचा मान //७//
