जगून बघ(झुंज)
जगून बघ(झुंज)
आला आहेस जन्माला
थोडंसं जगून बघ
जीवनी अमाप दुःख
थोडसं सोसून बघ ||१||
कोसळू नको दुःखाने
धीराने चढून बघ
यशाची चव चाखुनी
मोकळ्या आकाशी बघ ||२||
डाव मांडूनी तू सोपा
थोडंसं खेळूनी बघ
हरलास जरी आता
झुंज तू देऊन बघ ||३||
लढवय्या तू जगाचा
थोडासा लढून बघ
हार तू मानू नकोस
थोडंसं जगून बघ ||४||