जगावेगळी मैत्री
जगावेगळी मैत्री
एक होती मैत्री, एक आहे मैत्री,
नाही कळली जगाला,
कळली फक्त जीवाला,
तुझी नी माझी मैत्री....
अंधारातील दिवा जसा ती,
काळजावरील असा ठसा ती,
मीलनाची मग भ्रांती कशाला,
पाते लोचनी खात्री...
कोण ते आपण, काय तो नाता,
नसे प्रश्न हे, भेटवितो विधाता,
जसे खुलविती पाखरू फुलाला,
पुलकित होते गात्री....
दोन नयनांची मिळता मंजूरी,
चंद्राची का मग इथे जरुरी,
सहज स्पर्षति चांदणे मनाला,
अंधाराच्या रात्री.....

