STORYMIRROR

shubhangi arvikar

Others

3  

shubhangi arvikar

Others

काहीतरी

काहीतरी

1 min
293

काहीतरी बरळतो

राग नको मानू याचा,

काहीतरी हेतु मनी

काहीतरी सांगायचा।


जरी करोनीया धीर

तुज सांगीतले तरी,

रागावुनी लटकेच

म्हणशील 'काहीतरी!'


खरोखरी काहीतरी

माझ्या मनी तळमळे,

समीप तु येताक्षणी

तुज साठी उचंबळे।


काहीतरी सांगायाला

मन माझे धाव घेई,

बोलायाचे काहीतरी

अंती राहुनीया जाई।


काहीतरी निराळेच

मज दिसले तुझ्यात,

म्हणुनिया काहीतरी

कुजबुजे अंतरात।


काहीतरी उणेपणा

राहीला ग जीवनात,

तेच काहीतरी तुझ्या

शोधतो मी लोचनात।


'काहीतरी' ची ही व्यथा

अचानक जागी झाली,

काहीतरी मागण्यास

आज तुजपाशी आली।


'काहीतरी' चे हे गूढ

कुणाकसे समजावे,

काहीतरी झाले खास

एवढेच उमजावे।


Rate this content
Log in